नंदुरबार- धुळे ते सुरत महामार्गावर कोडाईबारी घाटात खासगी ट्रॅव्हल्सची बस काल दरीत कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघाताबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये एक प्रवासी तब्बल सात तास दोन मृतदेहांच्या जवळ अडकुन होता. मुजीदखान मनसुर खान पठाण असे या प्रवाशाचे नाव आहे. परिसरातील ग्रामस्थांनी व पोलीसांनी जखमी मुजीदखान यांना सुखरुप काढले. सुमारे सात तास दोन मृतदेह जवळ आपण बसलो आहोत यापासून मुजीदखान खान अनभिज्ञ होता.
कोंडाईबारी घाट अपघात- सात तास दोन मृतदेहाजवळ अडकला होता प्रवासी
अपघातग्रस्त बसमध्ये एक प्रवासी तब्बल सात तास दोन मृतदेहांच्या जवळ अडकला होता. मुजीदखान मनसुर खान पठाण असे या प्रवाशाचे नाव आहे. परिसरातील ग्रामस्थांनी व पोलीसांनी जखमी मुजीदखान यांना सुखरुप काढले. विशेष म्हणजे सुमारे सात तास दोन मृतदेहांजवळ आपण बसलो याची कल्पनाही मुजीदखान यांना नव्हती.
कोंडाईबारी घाटात झालेल्या आपघातात परिसरातील पाणबारा आणि मोरकारंजा गावातील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या आपघातग्रस्त बसमध्ये खिडकीत हा तरुण अडकला होता. तरुणाला काढण्यासाठी मदतकार्य करणाऱ्या यंत्रणा प्रयत्न करत होत्या. मात्र, नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने त्या ठिकाणचा पत्रा कापण्यासाठी आणलेलं गॅस कटर काम करत नव्हते. अखेर पानबारा गावातील नागरिकांनी उपलब्ध होईल त्या साधनांचा उपयोग करत सुमारे एका तासात नदीचा प्रवाह अडवला. त्यानंतर मदतकार्य सुरू झाले. पुलाखाली कोसळलेल्या ट्रॅव्हल्स खिडकीत पहाटे २ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत अडकलेल्या एका व्यक्तीचा पाय बसच्या पत्र्याच्या आत अडकल्यामुळे कटर मशिनच्या सहाय्याने पत्रा फाडून काढले. सात तास मृतदेहाजवळ बसून राहिल्याची कल्पना देखील तरुणाला नव्हती.