नंदुरबार- आदिवासी विकास विभागच्या प्रयत्नामुळे शहर वगळता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मजुरीसाठी गेलेल्या ४८० मजुरांना १८ बसेसद्वारे पुण्याहून नंदुरबारला आणण्यात आले आहे. या मजुरांना नंदुरबार येथून त्यांच्या गावा पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.
रोजगाराच्या शोधात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे हे मजूर आडकून पडले होते. कामधंदे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना घराकडे येण्याची ओढ लागली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात आडकलेल्या आदिवासी मजुरांची माहिती गोळा करून त्या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे, बाहेर आडकलेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.