महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : एकाच दिवशी 45 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

नंदुरबार जिल्ह्यात सोमवारी (दि. 20 जुलै) एकाच दिवशी तब्बल 45 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

file photo
file photo

By

Published : Jul 21, 2020, 4:39 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाच्या येणार्‍या अहवालात 10 ते 15 रूग्ण आढळुन येत होते. पण, सोनासंदर्भात आलेला जिल्ह्याचा अहवाल हायअलर्ट आला. कारण एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 45 जण पॉझिटीव्ह आढळुन आले आहेत. जिल्ह्याने बाधितांच्या आकडेवारीत हॉटस्पॉटची सिमारेषा ओलांडली असून रूग्णांची संख्या 410 वर येवुन पोहोचली आहे. त्यामुळे नंदुरबारकरांसह जिल्हावासियांची चिंता अधिकच गडद झाली असून खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर जिल्ह्यातील २० जणांनी कोरोनावर मात करून संसर्ग मुक्त झाले आहेत. त्यांना कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होण्यामध्ये आता नंदुरबार जिल्ह्याचा नंबर लागला आहे. चार महिन्यांपूर्वी कमी रूग्णसंख्येच्या गणनेत असणारा नंदुरबार जिल्ह्याने आता हायअलर्टची सिमा ओलांडल्याने बाधितांची आकडेवारी अवघ्या दोन महिन्यातच 400 वर पोहोचली आहे. मध्यंतरी 10 दिवसांपासून येणार्‍या अहवालात 10 ते 15 रूग्ण पॉझिटीव्ह आढळुन येत होते. परंतु काल सोमवारी दिवसभर आलेल्या अहवालात एकाच दिवशी तब्बल 45 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिकच गडद झाले असून नंदुरबार व शहादा शहर हे जणु कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण नंदुरबार शहर व तालुक्यात आहे. बाधितांच्या आकडेवारीत जिल्हा 400 च्या उंबरठ्यावर असतांना एकाच दिवशीच्या अहवालात काल आलेल्या अहवालात 45 जण पॉझिटीव्ह आढळल्याने बाधितांची संख्या 410 वर येवुन पोहोचली. कालच्या अहवालाने जिल्हावासियांमध्ये खळबळ उडाली.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात नंदुरबार येथील गणेश नगरात 60 वर्षीय पुरूष, रायसिंगपुरात 65 वर्षीय पुरूष, जुनी सिंधी कॉलनीत 70 वर्षीय पुरूष, देसाईपुरा भागात 43 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवती, 15 वर्षीय युवती, 69 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरूष, जुनी भोईगल्लीत 33 वर्षीय पुरूष, सरस्वती नगरात 20 वर्षीय युवक, एक 22 वर्षीय व 52 वर्षीय महिला, धर्मराज नगरात 39 वर्षीय पुरूष, पायल नगरात 40 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, जुनी सिंधी कॉलनीत 35 वर्षीय पुरूष, वृंदावन सोसायटीत 45 वर्षीय पुरूष, कमलनगर वाघोदे शिवार नंदुरबार 59 वर्षीय पुरूष, शिवाजी रोड 44 वर्षीय पुरूष, देवचंद नगर 35 वर्षीय पुरूष, 63 वर्षीय पुरूष, रायसिंगपुरा 51 वर्षीय पुरूष, नंदुरबार तालुक्यातील कोठदा येथे 65 वर्षीय महिला, शहादा तालुक्यातील गरीब नवाज कॉलनीत 40 वर्षीय पुरूष, तकीया बाजारात 50 वर्षीय पुरूष, गांधीनगरात 5 वर्षीय बालक, दिड वर्षीय बालिका, 22 वर्षीय युवती, 28 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरूष, सरदार पटेल चौक कुकडेल भागात 20 वर्षीय युवक, कुंभारगल्लीत 17 वर्षीय युवक, 43 वर्षीय पुरूष, गरीब नवाज कॉलनीत 21 वर्षीय युवती, गांधी चौक गुजरगल्लीत 52 वर्षीय पुरूष, शहाद्यातील मच्छीबाजारात 48 वर्षीय पुरूष, अब्दुल हमीद चौकात 52 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला. तसेच नवापूर येथील सरदार चौकातील 48 वर्षीय पुरूष, इंदिरा नगरात 70 वर्षीय पुरूष, शेफालीपार्कमध्ये 42 वर्षीय पुरूष आणि तळोद्यातील कुरेशी गल्लीत 40 वर्षीय पुरूष तर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल असलेला शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचातील मंजीपुरा येथील 25 वर्षीय युवक असे एकुण 45 जण एकाच दिवशी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बाधितांच्या वास्तव्याचा परिसर प्रशासनाने कंटेंटमेंट झोन म्हणुन तयार केला असून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. या बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आरोग्य विभागाकडुन शोध घेण्यात येत असून यासाठी सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 400 झाली असून त्यापैकी 233 जणांनी कोरोनावर मात करुन संसर्गमुक्त झाले आहेत. 145 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details