महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागड्या दुचाकींची चोरी करणारे नवापूर पोलिसांच्या जाळ्यात - sandeep chaure

नवापूर शहरात पोलीस रात्रीची गस्त घालत असताना त्यांना चार तरुण संशयितरित्या आढळून आले

आरोपी आणि मुद्देमालासह पोलीस

By

Published : Jul 18, 2019, 10:43 PM IST

नंदुबार- नवापूर शहरात पोलीस रात्रीची गस्त घालत असताना त्यांना चार तरुण संशयितरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यापैकी तिघांनी शहरात मोटरसायकल चोरीसाठी आलो असल्याची कबुली पोलिसांना दिली. तर एक जण संशयित असल्याने त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

माहिती देताना नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह परदेशी

हेमंत सोनवणे, रवींद्र पवार, संदीप चौरे हे तिघे महाविद्यालयीन तरुण असून महागड्या गाड्या फिरवण्याची हौस असल्याने त्यांनी मोटरसायकल चोरीला सुरवात केली. त्यांनी आत्तापर्यंत नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून चोऱ्या केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी त्यांच्या कडून ५ लाख किंमतीच्या ८ मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. या आरोपींकडून अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details