नंदुरबारमध्ये शनिवारी 21 नविन कोरोनाबाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 355 वर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या खुप कमी होती. नंतरच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नव्हता. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मे महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित आढळले. यानंतर त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 355 वर पोहोचली आहे.
नंदुरबार कोरोना अपडेट
By
Published : Jul 19, 2020, 10:56 AM IST
नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ आहे. शनिवारी दिवसभरात चार वेगवेगळ्या टप्प्यात आलेल्या अहवालात 21 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 355 वर पोहोचली आहे.
शनिवारी आढळलेल्या 21 बाधितांमध्ये शहरातील 14 तर शहादा तालुक्यातील 7 बाधितांचा समावेश आहे. तर यासोबत शनिवारी शहादा तालुक्यातील पाडळदा येथील 74 वर्षीय वृध्दाने कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या खुप कमी होती. नंतरच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नव्हता. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मे महिन्यात पुन्हा कोरोनाबाधित आढळले. यानंतर त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 355 वर पोहोचली आहे.
शनिवारी चार टप्प्यात कोरोनाबाधितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात पाच, सायंकाळी 11, त्यानंतर आणखी एक व्यक्ती तसेच रात्री आलेल्या अहवालात आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले.
शनिवारी आढळेलेले कोरोनाबाधित -
नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील 38 वर्षीय पुरुष
तेलीवाडी परिसरातील एक पुरुष
तांबोळी गल्लीतील 79 वर्षीय वृध्द
भाटगल्लीतील 65 आणि 23 वर्षीय दोन महिला, तीन वर्षीय बालिका, 61 वर्षीय पुरुष
तापी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती असलेले 55 आणि 60 वर्षीय दोन महिला
देसाईपूरा परिसरातील 48 वर्षीय दोन महिला
विमल हौसिंग सोसायटीतील 13 वर्षीय मुलगी
लक्ष्मीनगर येथील 41 वर्षीय पुरुष
जिल्हा रूग्णालयातील 34 वर्षीय पुरुष
शहादा येथील खेतिया रोडवरील 55 वर्षीय पुरुष
देवदार गल्लीतील 67 वर्षीय महिला
मंदाणे येथील 30 वर्षीय पुरुष
शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील 42 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा
शहादा गांधीनगर येथील 53 वर्षीय मृत पुरुष कोरोनाबाधित आढळुन आला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या -355
बरे झालेले रुग्ण -220
उपचार सुरू असलेले रुग्ण118
एकूण मृत्यू -17 (नंदुरबार - 11, शहादा - 5, नवापूर - 1)