महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2020, 6:23 PM IST

ETV Bharat / state

नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 195 कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी केंद्र सरकारने 195 कोटीचा निधी मंजूर केला आहे. लवकरच याचे बांधकाम सुरू होणार असून येथील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

nandurbar medical college
वैद्यकीय महाविद्यालय

नंदुरबार - जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी केंद्र सरकारने 195 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नंदुरबार येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती खासदार डॉ. हिना गावीत यांनी दिली.

माहिती देताना खासदार डॉ. हिना गावित

खासदार गावीत यांनी नंदुरबार येथील निवासस्थानी शुक्रवारी (दि. 3 जुलै) पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते.

यावेळी खासदार गावीत म्हणाल्या की, नंदुरबार येथील टोकरतलाव रस्त्यालगत 13.63 हेक्टर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 325 कोटींचा निधी लागणार असून त्यात केंद्र सरकारकडून 60 टक्के म्हणजे 195 कोटी व राज्य सरकारकडून 40 टक्के म्हणजे 130 कोटी असा निधी मिळणार आहे. केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी निधी मंजूर केले असून राज्यात केवळ नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी फेब्रुवारी महिन्यात निधी मंजूर झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने 195 कोटींचा निधी दिला असून लवकरच नंदुरबारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे.

या महाविद्यालयामुळे विविध विभाग जिल्ह्यात उभे राहतील. आरोग्याच्या समस्यांबाबत नंदुरबार जिल्हा नेहमी पुढे राहिला आहे. मात्र, आता वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यावर आरोग्याच्या समस्या सुटणार आहेत. तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नंदुरबारामध्येच आपले वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असेही खासदार म्हणाल्या.

हेही वाचा -नंदुरबारमधील कापूस खरेदीचे प्रमाण वाढवा; शेतकऱ्यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details