नांदेड- मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील एक युवक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून गंभीर जखमी झाला आहे. विहिरीतून पाणी काढताना त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. शाम गंगाधर गवते (वय- 20) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
हंडाभर पाण्यासाठी धोक्यात घालावा लागतोय जीव, नांदेडमध्ये विहिरीत पडून युवक गंभीर जखमी - हंडाभर
मुखेड तालुक्यातील होकर्णा येथील एक युवक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून गंभीर जखमी झाला आहे.
मुखेड तालुका भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असून ग्रामीण भागात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. शाम गवते विहिरीत पडल्यानंतर त्याला नागरिकांनी बाजेच्या सहाय्याने वर काढले. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल करण्यात आले होते. परंतु उपजिल्हा रुग्णालयात अर्धा तास थांबल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसल्याने तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.