नांदेड - धुलिवंदनाच्या दिवशी हात-पाय धुण्यासाठी इसापूर धरणाच्या चेनापूर कॅनॉलमध्ये उतरलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने तो वाहून गेला आहे. गुरुवारपासून पोलिसांचे बचाव पथक त्याचा शोध घेत असून, अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.
कॅनॉलमध्ये उतरलेला तरुण गेला वाहून, अद्याप बेपत्ताच - ardhapur
तो गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉलच्या दिशेने गेला होता.
मोहन विजयबाबू विरकर असे या तरुणाचे नाव आहे.
मोहन विरकर हाअर्धापुरमधील गवळी गल्ली येथील रहिवासी आहे. तोगुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हात पाय धुण्यासाठी कॅनॉलच्या दिशेने गेलाहोता. बाजुला असलेल्या इतर मित्रांना पाण्यात पडल्याचा आवाज आल्याने सर्वांनी कॅनॉलकडे धाव घेतली. मोहन पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोहनला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला.
Last Updated : Mar 22, 2019, 11:59 PM IST