नांदेड - घरावरील जुने लोखंडी पत्रे काढून ते दुरुस्तीचे काम करत असताना वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना उमरी तालुक्यातील तळेगाव येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
घरावरील छताची पत्रे दुरूस्त करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू - shock
तळेगाव येथील प्रकाश ज्ञानू नागेश्वर हा तरुण रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या घरावरील जुने लोखंडी पत्रे काढून ते दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी अचानक हातातील लोखंडी पत्र्याचा वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने तो जमिनीवर पडला.
तळेगाव येथील प्रकाश ज्ञानू नागेश्वर हा तरुण रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या घरावरील जुने लोखंडी पत्रे काढून ते दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी अचानक हातातील लोखंडी पत्र्याचा वीज प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने तो जमिनीवर पडला. त्याला उपचारार्थ उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉ. चव्हाण यांनी मृत घोषित केले आहे.
प्रकाश गावात मेकॅनिकचे काम करत होता. गावातच कुलर, पंखे इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, अचानक झालेल्या या दुर्घटनेने कुटुंबावर डोंगर कोसळला. प्रकाश हा घरात एकमेव कमावता होता. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.