महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणाने पोलीस ठाण्यातच स्वत:ला घेतले पेटवून; फौजदार काळेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - police station

हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला अत्याचार आणि सासुरवाडीच्या मंडळीच्या त्रासामुळे थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी तरुणाच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमायतनगर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हिमायतनगर पोलिस ठाणे

By

Published : Jul 18, 2019, 1:09 PM IST

नांदेड - हिमायतनगर ठाण्यातील फौजदाराने केलेला अत्याचार आणि सासुरवाडीच्या मंडळीच्या त्रासामुळे थेट पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी तरुणाच्या जबाबावरुन फौजदार ज्ञानोबा काळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमायतनगर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. शहरात परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हिमायतनगर पोलिस ठाणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळीत युवक शे.सद्दाम शे.अहेमद (रा.हिमायतनगर) याने नांदेडला न्यायाधीश व पोलिसांच्या समक्ष मृत्यूपूर्व जबाब दिला. त्यानुसार, शे.सद्दाम से.अहमद हा युवक माहेरी गेलेल्या पत्नी व दोन मुलांना आणण्यासाठी सासुरवाडीला गेला होता. यावेळी त्याचा सासरा, मेहुणा व इतर दोघांनी त्याला मारहाण केली. याबाबतची तक्रार देण्यासाठी युवक हिमायतनगर पोलीस ठाण्यात गेला असता, संतोष जिचकार याच्या सांगण्यावरून पोलिसांनी युवकाची तक्रार नोंदवली नाही. तर उलट फौजदार ज्ञानोबा काळे, जमादार संतोष राणे यांनी त्याला जबर मारहाण केली. सोबतच त्याच्या जवळ असलेली १७ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ५ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली. असे शे.सद्दाम शे.अहमद यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.
पीडित तरुणाने जबाबात म्हटले आहे, की माझ्याविरुद्ध कोणताही तक्रार नसताना, पोलिसांनी मला मारहाण केली. यामुळे पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी आणि माझी अंगठी आणि रक्कम मला परत करावी. अन्यथा मी हिमायतनगर पोलीस ठाण्यासमोर जीव देईल, असे निवेदन मी ठोणेदार आणि तहसीलदार यांच्याकडे केले होते. पण निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मी १४ जुलैला सायंकाळी, अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले.
हा जबाब हिमायतनगर पोलीस ठाण्याकडे रात्री आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.मुदिराज यांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास हिमायतनगर पोलीस डायरीत फौजदार ज्ञानोबा काळे, संतोष जिचकार, संतोष गंगाराम राणे, शे.सिराज शे.सरदार,शे.सरदार, जिशान मिझ या सहा जणांवर कलम ३०६, ३९२, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शे.सिराज शे.सरदार, शे.सरदार या दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान युवकांची प्रकृती गंभीर असून,गुन्हा दाखल होण्यापूर्वी हिमायतनगर पोलीस ठाण्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details