नांदेड -किनवट तालुक्यातील इस्लापूर जवळ शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास संतोष विनायक राठोड (वय ३०, रा.पांगरी तांडा) हा युवक इस्लापूरहून-पांगरी तांडा येथे जात होता. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहून गेला. शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या संतोषचा शोध अद्याप सुरू आहे. प्रशासन व गावकरी मिळून दोन दिवसापासून संतोषचा शोध घेत आहेत.
किनवट तालुक्यातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू - Drain Flood
नाल्याला पूर आल्याने संतोष सोबतचे इतर लोक पांगरीतांडाकडे न जाता वाळकी आणि इस्लापुर येथे थांबले होते. मात्र, संतोषने नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले.
नाल्याला पूर आल्याने संतोष सोबतचे इतर लोक पांगरी तांडाकडे न जाता वाळकी आणि इस्लापूर येथे थांबले होते. मात्र, संतोषने नाला पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुरात वाहून गेला, असे गावकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी वाहून गेलेल्या संतोषचा पांगरीचे गावकरी, नातेवाईक यांनी शोध घेतला, पण संतोष सापडला नाही. इस्लापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठू बोने, जमादार जाधव यांच्या सहकाऱ्यांनी सहस्त्रकुंड पर्यंत शोध घेतला, पण तो आज सकाळपर्यंत सापडलेला नाही.