महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 10 दिवस राहणार बंद - Yeola APMC closed for 10 days

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व मकासह भुसार लिलाव हे 10 दिवस बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांच्या अर्जानुसार तसेच धुलीवंदन,होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याने कांदा व भुसार लिलाव यावेळी बंद असणार आहे.

Yeola Agricultural Produce Market Committee
येवला बाजार समिती

By

Published : Mar 25, 2021, 9:41 PM IST

येवला (नाशिक) - नाशिक जिल्हा कांद्याची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अशा जिल्ह्यातीलयेवला कृषी उत्पन्न बाजार समिती सणांमुळे आजपासून 10 दिवस बंद राहणार आहे. या बंद दरम्यान बाजार समितीमधील कांदा व भुसार लिलाव बंद राहणार आहेत.


येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व मकासह भुसार लिलाव हे 10 दिवस बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांच्या अर्जानुसार तसेच धुलीवंदन,होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याने कांदा व भुसार लिलाव यावेळी बंद असणार आहे. त्याचप्रमाणे मार्च अखेर असल्याने बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती 10 दिवस राहणार बंद

हेही वाचा-घसरणीचा फटका; दोन दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांचे ७ लाख कोटी पाण्यात!

कांदा व धान्य कुठे विकावे शेतकऱ्याला पडला प्रश्न-
कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व मका तसेच भुसार लिलाव हे दहा दिवस बंद राहणार आहे. आजपासून ते शनिवारी 27 मार्चपर्यंत व्यापाऱ्यांनी अर्ज दिल्याप्रमाणे लिलाव बंद राहणार आहे. रविवारी सोमवारी होळी व धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मुळे बंद लिलाव बंद राहणार आहे. तसेच 31 मार्च ते 1 एप्रिल मार्च अखेर असल्याकारणाने कोणत्याही प्रकारचे कांदा लिलाव होणार नाहीत. 2 एप्रिलला रंगपंचमीनिमित्त तसेच शनिवारी तीन एप्रिलला व्यापारी दिलेल्या अर्जाप्रमाणे कांदा व मकासह भुसार लिलाव हे बंद राहणार आहेत. एकूणच पाहता सलग 10 दिवस बाजार समिती बंद राहणार आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कांदा व भुसार धान्य कुठे विकावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका ; शेअर बाजारात ९०० अंशांची पडझड


सणांमुळे परप्रांतीय हे परराज्यात जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुट्टी देण्याची मागणी केली आहे. विक्रमी लिलाव करून कांद्याचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या अर्जावरून नाईलाजास्तव मार्केट बंद ठेवण्याची वेळ आल्याचे येवला बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी सांगितले. कांद्याची बाजारपेठेत आवक वाढण्याची शक्यता आहे. कांद्याचे लिलाव तातडीने घेण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details