नांदेड - किनवट शहरालगतच्या मांडवा रोडवरील नाल्यात एका महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकिस आली आहे. मुक्ता इंगळे असे या महिलेचे नाव असून ती माळबोरगाव येथील रहिवासी आहे.
नांदेडमध्ये महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; मृतदेह फेकला नाल्यात - physical abusing
मुक्ता शुक्रवारी मांडवा येथील आश्रम शाळेत मुलीला सोडायला गेली होती.
मुक्ता पुंडलीक इंगळे हिचा विवाह यवतमाळमधील पुसद तालुक्यातील लोणदरी येथील विठ्ठल झाडे यांच्याशी झाला होता. पाच वर्षाआधी मुक्ता इंगळेचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या २ मुलींना घेऊन माहेरीच राहत होत्या. मुक्ता शुक्रवारी मांडवा येथील आश्रम शाळेत मुलीला सोडायला गेली होती. परत येत असताना किनवट शहरालगतच्या नाल्यात तिच्यावर बलात्कार करून तिची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना शवविच्छेदन प्रक्रियेनंतर गुन्ह्याची नोंद केली आहे. या संपुर्ण घटनेचा तपास किनवट पोलीस करत आहेत.