नांदेड - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष तथा डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. दर्पण दिनाचे औचित्य साधून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यात सहस्त्रबुद्धे बोलत होते.
रचनात्मक पत्रकारिता काळाची गरज
ते म्हणाले की, बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहण्याची गरज आहे. चांगला बदल सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. खरे तर कामगार कपातीमुळे रोजगार बुडाला म्हणून हताश होण्याची गरज नाही. तर पत्रकारिता प्रगल्भ करण्याची गरज आहे. रचनात्मक पत्रकारिता काळाची गरज आहे. बदल समजापुढे आला पाहिजे. बातमीच्या जुन्या व्याख्यांमध्ये न आडकता सकारात्मकता असणारी बातमी लोकांपुढे आली पाहिजे. निराशाजनक पत्रकारिता कमी होणे आवश्यक आहे.
कोरोनाने मृत पत्रकारांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे - help to journalists who died in Corona
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष तथा डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. दर्पण दिनाचे औचित्य साधून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यात सहस्त्रबुद्धे बोलत होते.
नांदेड पत्रकार सन्मान सोहळा