नांदेड - राज्यात सत्तांतर झाले व ठिकठिकाणची राजकीय गणिते बदलली. मागील अडीच वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विकास कामांनी पकडलेली गती कायम राहील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या अशोक चव्हाणांनी ( Ashok Chavan ) राजकीय वजन वापरून अनेक कामे खेचून आणली. पण आता सरकार कोसळल्याने जिल्ह्यातील ती कामे पूर्ण होणार की प्रस्थापितांचे राजकीय खच्चीकरण करताना विकास रखडणार ( Nanded Development Project ), याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते,गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्यात विकासाने गती पकडली होती. नांदेड शहरात अशोक चव्हाण यांनी अनेक उड्डाणपुलांसाठी मंजुरी आणली होती. केंद्रीय महामार्ग, राज्य महामार्ग याला मंजुरी देऊन नांदेड शहराला हे मार्ग जोडण्यासाठी प्रयत्न केले. बांधकाम खाते त्यांच्याकडे असल्याने शहरातील विविध रस्त्यांना निधी उपलब्ध करून हे रस्ते चौपदरीकरण्याचे काम सुरू झाले होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा मार्ग, महामार्ग, राज्य मार्गांच्या रस्त्यांना निधी उपलब्ध केला गेला. राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी विविध योजनांसाठी दिला. नवीन सरकार आल्याने जिल्ह्याला एखाद-दुसरे मंत्रिपद मिळाले. तरी दीर्घ राजकीय अनुभवाचा अभाव असल्याने त्याचा वापर किती होतो, हा मोठा प्रश्न असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात.
हेही वाचा -Cabinet Decision : मंत्रिमंडळ निर्णय ‘झेडपी’च्या सदस्यसंख्येबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय