महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू - हेमंत पाटील

हिमायतनगर येथे रविवारी सायंकाळी आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात उपस्थित हेमंत पाटीलांनी हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

By

Published : Jun 12, 2019, 2:24 PM IST

आयोजित कार्यक्रमात बोलतांना हेमंत पाटील

नांदेड - हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेने मला २ लाख 87 हजार मताधिक्य देऊन विजयी केले. आपली सेवा करण्याची संधी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. या भागात सिंचनाचा अनुशेष कायम आहे. या मतदारसंघात कायम स्वरूपी सिंचन व्यवस्था मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील यांनी केले.

आयोजित कार्यक्रमात उपस्थित हेमंत पाटील व इतर मान्यवर

हिमायतनगर येथे रविवारी सायंकाळी खासदार हेमंत पाटील यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. याबरोबरच थेट जनतेशी संवाद व रसाळीचा कार्यक्रमही राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी सुचवलेला कौठा ज. येथील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असून या ३ हजार सहाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाकरीता एकही गाव बुडीत क्षेत्रात नाही ही जमेची बाजू असल्याचे सांगितले.

शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. व्हॉट्सअॅप नंबरवर आपली तक्रार, मागणी करावी निश्चितच त्या तक्रारीचे निवारण होईल. आगामी विधानसभा निवडणुकीत ही शिवसेनेचा भगवा निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दतराव कोकाटे, माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कवळीकर, परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, अजयराव देशमुख सरसमकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details