महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड शहरातील अनेक भागात पाणीटंचाई; कोरोनाच्या धास्तीतही नागरीक पाण्यासाठी घराबाहेर

विष्णूपुरी पंप स्टेशन येथून जुन्या शहराला पाणी पुरवठा होतो. या पंप स्टेशनमधील एक मोटार नादुरूस्त झाल्यामुळे जुन्या नांदेडसोबतच कौठ्यातील काही भाग तसेच वसरणी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

By

Published : Apr 9, 2020, 10:50 PM IST

water shortage in nanded
नांदेड शहरातील अनेक भागात पाणीटंचाई; कोरोनाच्या धास्तीतही नागरीक पाण्यासाठी घराबाहेर

नांदेड - कोरोनाच्या धास्तीमुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले असताना, शहरातील अनेक भागात पाणी येत नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. विष्णूपुरी स्टेशनमधील एक मोटार नादुरुस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नळातून पाणी येणे बंद झाले असून, कोरोनामुळे घराच्या आत राहण्याऐवजी लोकांना पाण्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागत असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड शहरातील अनेक भागात पाणीटंचाई; कोरोनाच्या धास्तीतही नागरीक पाण्यासाठी घराबाहेर
कौठ्याचा काही भाग, वसरणी, इतवारा, होळी, चौफाळा, गाडीपुऱ्याचा काही भाग, किल्ला रोड अशा अनेक भागातील पाणीपुरवठा सध्या बंद असल्याने दुसरीकडे जावून किंवा बोअर असलेल्या ठिकाणी जावून पाणी आणावे लागत आहे. विष्णूपुरी पंप स्टेशन येथून जुन्या शहराला पाणी पुरवठा होतो. या पंप स्टेशनमधील एक मोटार नादुरूस्त झाल्यामुळे जुन्या नांदेडसोबतच कौठ्यातील काही भाग तसेच वसरणी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. घराबाहेर पडणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, पाणी म्हणजेच 'जीवन' असल्यामुळे पाण्यासाठी या भागातील नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे जिथे कुठे बोअर, हापसा असेल तेथून विनंत्या करून पाणी भरावे लागत आहे. शहरात निर्माण झालेल्या या भीषण पण कृत्रिम पाणीटंचाई बाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता याबाबीला प्रशासनातील लालफितीचा कारभार कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.

नादुरूस्त झालेली मोटार दुरूस्तीसाठीची संचिका केवळ 'टेबल-बाय-टेबल' फिरल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या दुष्टचक्रात निर्माण झालेल्या या कृत्रिम पाणीटंचाई कडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले. नागरिकांनीही आज ऐवजी उद्या पाणी येईल, असे समजून दोन दिवस तिकडे लक्ष दिले नाही. नंतर मात्र काही जागरूक नागरिकांनी नगरसेवकांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर जुन्या नांदेडातील एका नगरसेवकाने याबाबत समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून मोटार बंद असल्याबाबतची माहिती नागरिकांना दिली आणि त्यावर दोन दिवसात तोडगा निघेल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, त्या घटनेलाही चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. कोरोना आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटात नागरिक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details