नांदेड- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात पाणीसाठा कमी झाल्यामुळे २८ मे पासून शहरातील सर्व भागात ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.
शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या विष्णूपुरी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा कमी होत आहे. यामुळे शहराला पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेऊन महानगर पालिकेने शहरातील सर्व भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्र लाट झाली आहे. सद्या विष्णूपुरीतील पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरावा यासाठी नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे.