महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात विहिरीने गाठला तळ, पाणी शेंदण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.

By

Published : Apr 30, 2019, 5:12 PM IST

मुखेड : विहिरीतील पाण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

नांदेड - मुखेड तालुक्यातील नागरिकांना थोड्याशा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी तळ गाठलेल्या ४० ते ५० फुट खोल विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.

मुखेड : विहिरीतील पाण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

एका कडब्याच्या पेंडीचा भाव १५ ते १८ रुपये आहे. विकतचा चारा आणून जनावरांना घालणे शेतकऱ्यांना परवडत नाही. मुक्रमाबादसह तालुक्यातील नदी नाले, विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील अनेक गावात हंडाभर पाण्यासाठी महिला पुरुष दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करत आहेत. एवढ्यावर ही कसरत थांबत नसून मानवी हाताची साखळी करून विहिरीत उतरावे लागत आहे.

मुखेड तालुक्यात अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण तालुक्यातील भीषण पाणी टंचाई पाहता टँकरही अपुरे पडत आहेत. पाण्याच्या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी शासनाने गावस्तरावर नळ योजना राबवून त्यावर करोडो रुपये खर्ची केले, पण अनेक गावातील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details