महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ; नांदेडकरांना दिलासा

पालम येथील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्यूसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले असून सोमवारी सकाळी हे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. या पाण्यामुळे प्रकल्पाचा साठा मंगळवारी सायंकाळी १७.६६ दशलक्ष घनमीटरवरुन २७.४२ दलघमी झाला आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठा ३३.९४ क्के झाला आहे.

By

Published : Aug 28, 2019, 2:13 PM IST

विष्णुपुरी प्रकल्प

नांदेड - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढल्यानंतर मराठवाड्यातील इतर भागाची तहान भागवण्यासाठी जायकवाडीतून गोदा पात्रात पाणी सोडण्यात आले. वरच्या बाजूचे सर्व बंधारे व प्रकल्प ५० टक्यांपेक्षा जास्त भरल्यानंतर ते पाणी खालील बाजूला सोडण्यात येत आहे. यामुळे नांदेड शहराची तहान भागवणारे विष्णुपुरी प्रकल्पात दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोमवारी सकाळी विष्णुपुरीत दाखल झाले होते. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून नांदेडकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

हेही वाचा - विष्णुपुरीतील मृत जलसाठ्यात ४ इंचाने झाली वाढ; पाण्यावर राहणार १५ दिवस पहारा

मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रकल्पातील पाणीसाठा ३३.९४ टक्के झाला होता. मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून परतीचा पाऊस येईल का नाही, याबाबत आज अंदाज लावता येणार नाही. यामुळे मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी प्रकल्प धावून आला आहे. योगायोगाने नाशिक व नगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने त्या भागातील सर्व प्रकल्प भरल्यामुळे गोदावरीच्या पात्रात अतिरक्त पाणी सोडण्यात आले. यामुळे आठ वर्षांनंतर पाहिल्यांदा जायकवाडी धरणात पाणी साठा सुमारे ८९ टक्क्यांवर गेला आहे. सध्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून धरणातून मराठवाड्यातील इतर भागासाठी पाणी सोडण्यात येत आहे. गोदापात्रातील १२ बंधारे जवळपास २५ ते ५० टक्के भरल्यानंतर हे पाणी पुढे सोडण्यात येत आहे.
हेही वाचा - आजची बेरोजगारी आणि गांधीवादी अर्थशास्त्राची गरज

पालम येथील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्यूसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले असून सोमवारी सकाळी हे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. या पाण्यामुळे प्रकल्पाचा साठा मंगळवारी सायंकाळी १७.६६ दशलक्ष घनमीटरवरुन २७.४२ दलघमी झाला आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठा ३३.९४ क्के झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details