नांदेड - राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर हे येत आहेत.
नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर; संजय जाधवांची मुंबईत बदली - पोलीस अधीक्षक संजय जाधव
भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या.
भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. त्यात नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर हे बदलून येत आहेत. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजा राम सामी यांची राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यात व स्थानिक राजकारणी मंडळीत नियुक्त्यावरून वाद निर्माण झाले होते. प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या जागेवर आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी एक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. मात्र, प्रशासकीय बाबीमुळे त्यांची वर्णी न लागल्याने हा वाद चांगलाच रंगला होता. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी वेगवेगळे बंदोबस्त, निवडणुका, सण, महोत्सव आदी चांगल्या पध्दतीने हाताळले होते.