नांदेड- येथील आरटीओ कार्यालयात घुसून एका वाहन निरीक्षकास जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे शनिवारी हा प्रकार घडला असून अद्याप याबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
हेही वाचा - काळ्या जादूतून मुक्त होण्यासाठी ३ वर्षाच्या मुलीला ७व्या मजल्यावरून फेकल्याची आरोपीची कबुली
नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी दुपारच्या सुमारास जमाव घुसला. आमच्या नेत्याबद्दल अपशब्द का वापरले? असा जाब त्या अधिकाऱयास विचारण्यात येत होता. आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे तो अधिकारी या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यानंतर अचानक या जमावाने अधिकाऱ्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्याच्या बचावासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जमावाने मारहाण केली.