महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात; चव्हाणांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

बहुप्रतिक्षित कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यात झाला असून, पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला.

Corona vaccination news
कोरोना लसीकरण नांदेड

By

Published : Jan 16, 2021, 7:09 PM IST

नांदेड - बहुप्रतिक्षित कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यात झाला असून, पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला. ही लस घेण्यासाठी सर्व दडपनांना झुगारून पुढे येत त्यांनी आरोग्य साक्षरतेच्या लसीकरण चळवळीचा नवा अध्याय निर्माण केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनमोकळा संवाद साधत जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

नांदेड जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात

मागील दीड वर्ष आरोग्य विभागाने स्वतःला झोकून दिले

मागील दिड वर्षे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने स्वत:ला झोकून देवून काम केले आहे. यात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आशा वर्करपासून कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपर्यंतच्या यंत्रणेचा समावेश आहे. ज्या धैर्याने जिल्ह्यातील लोकांनी शासनाने दिलेल्या सर्व उपाय योजनांचा अवलंब करून कोरोनाशी दोन हात केले, त्याच धैर्याने नांदेड जिल्हावासी लसीकरणासाठी पुढे येऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेला साथ देईल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय विभागातील सर्व टीमला शुभेच्छा

अशोक चव्हान यांनी वैद्यकीय विभागातील सर्व टिमला लसीकरणाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रारंभी आमदार अमर राजूरकर यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कोविड काळात केलेल्या सेवेबद्दल नांदेडकरांच्यावतीने कृतज्ञता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांचा सत्कार केला.

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे लसीकरणाला प्रारंभ

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा शुभारंभ मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला. या ग्रामीण लसीकरणाच्या शुभारंभाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य सेवक मोहमंद खैसर मो. इस्माईल यांना मिळाला.

लसीकरणाला सुरुवात म्हणजे हा आनंद दिवाळीपेक्षा मोठा

कोविड काळात आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी हिरहिरीने सेवा दिली. शासनस्तरावरून त्यांना ज्या सूचना भेटल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी करून दाखविली. लसीकरणाची ही मोहीम आरोग्य विभागातील संपूर्ण कर्मचाऱ्यांसमवेत महिला टिम समर्थपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी महिला कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी: काका-पुतण्या तर सासू-सुनांचा एकमेकांविरोधात शड्डू

लसीकरणाचा आजचा दिवस दिवाळीच्या सणापेक्षा मोठा असून खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या भीतीतून आपण कात टाकली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले. लम्पी असो अथवा बर्ड फ्ल्यू आजार, या कठीन काळात जनतेला सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शासकीय यंत्रणा कुठे कमी पडली नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा मांडला.

17 हजार हेल्थ वर्करचे होणार लसीकरण

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 99 हेल्थ वर्करना लस दिली जाणार आहे. यात 631 वैद्यकीय अधिकारी, 1 हजार 489 परिचारिका, 1 हजार 530 अशा वर्कर्स, 5 हजार 632 अंगणवाडी सेविका, 1 हजार 845 बहुउद्देशीय कर्मचारी, 2 हजार 957 फ्रंटलाईन वर्कर, 1 हजार 323 पॅरामेडिकल, 1 हजार 302 सहाय्यक कर्मचारी, 390 कार्यालयीन संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिरसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा -नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जानापुरीत तुफान हाणामारी

ABOUT THE AUTHOR

...view details