महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

UPSC : नांदेडच्या पोलीस पुत्र 'रजत'ला दुसऱ्या प्रयत्नात 'सुवर्ण' यश, ६०२ रँकिग

नांदेडचा सुपूत्र रजत नागोराव कुंडगिरने 'युपीएससी' परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. रजत कुंडगिर यूपीएससीच्या रँकिंगमध्ये भारतात ६०२ नंबरवर आहे. रजत हा नांदेडमधील पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याने दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास केला.

रजत नागोराव कुंडगिर
रजत नागोराव कुंडगिर

By

Published : Sep 25, 2021, 11:15 AM IST

नांदेड : नांदेडचा सुपूत्र रजत नागोराव कुंडगिरने 'युपीएससी' परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. रजत कुंडगिर यूपीएससीच्या रँकिंगमध्ये भारतात ६०२ नंबरवर आहे. रजत हा नांदेडमधील पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. दरम्यान, रजतवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वडिल पोलीस उपनिरीक्षक, तर आई उद्योजिका

रजत कुंडगिरचे वडिल एन. बी. कुंडगिर हे नांदेड येथे पोलीस दलात उपनिरीक्षक आहेत. रजतची आई शंकुतला नागोराव कुंडगिर या कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका सुप्रसिद्ध फ्लोअर मिलच्या उद्योजिका आहेत.

दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास

नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पटेलनगर दिल्ली येथील 'वाजीराम' क्लासेसमध्ये रजतने गत दोन वर्षापासून आपला अभ्यास पूर्ण केला आहे.

दुसऱ्या प्रयत्नात यश

दुसऱ्या प्रयत्नात रजत कुंडगिरने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) यश संपादित केले आहे. त्याच्या या यशाबद्दल नांदेड येथे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शुभम कुमार देशात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. 761 उमेदवार या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेत बिहारच्या शुभम कुमारने प्रथक क्रमांक पटकावला आहे. यूपीएससीच्या निकालापूर्वी त्याची भारतीय संरक्षण लेखा सेवामध्ये निवड झाली. तो सध्या पुण्यात प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याशी आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीने बातचित केली. संधी मिळाली तर ग्रामीण विकासासाठी काम करण्यास मला आवडेल, अशी प्रतिक्रिया शुभमने दिली.

नांदेडचा सुमितकुमार पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण

लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२० च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात नांदेडचा सुमितकुमार दत्ताहरी धोत्रे हा देशात 660 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे सुमितकुमारने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्याचे कौतूक केले जात आहे.

उस्मानाबादचा निलेश गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी रँकमध्ये

भारतीय लोकसेवा आयोग-यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच त्यांनी यूपीएसी परीक्षेत यश संपादित करत देशात 752 क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी त्यांची संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्ती झाली होती. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा -आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; राजेश टोपेंनी दिलगिरी व्यक्त करत न्यासा संस्थेवर फोडले खापर

ABOUT THE AUTHOR

...view details