नांदेड - देगलुर राज्य महामार्गावर नांदेडकडून बिदरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सची शंकरनगरजवळ स्कूटीला समोरासमोर जबर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात भोपाळा (ता. नायगाव) येथील चुलते-पुतणे ठार झाले. हुशेन अहेमदसाब सय्यद (वय-४५) आणि फेरोज बाबु सय्यद (वय-१९) अशी मृतांची नावे असून ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
नांदेडमध्ये मिनी ट्रव्हल्सची स्कूटीला धडक; चुलता-पुतण्या जागीच ठार - deglur
या भीषण अपघातात भोपाळा (ता. नायगाव) येथील चुलते-पुतणे ठार झाले. हुशेन अहेमदसाब सय्यद (वय-४५) आणि फेरोज बाबु सय्यद (वय-१९) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री साईबाबा विद्यालयत सेवक म्हणून कार्यरत असलेले भोपाळा येथील हुसेन अहेमदसाब सय्यद (चुलते) हे नेहमीप्रमाणे शंकरनगरमध्ये स्कूटीवर (एम.एच.२६ बिके.०९५६) आपल्या पुतण्यास घेऊन येत असताना नांदेडकडून बिदरकडे जाणाऱ्या मिनि ट्रव्हल्सची (एम.एच. २० एवाय ८६३२) स्कूटीला समोरासमोर जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात फेरोज यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. या अपघातात ते जागीच ठार झाले, तर त्यांचा पुतण्या हुसेन हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.