नांदेड -मुखेड तालुक्यातील जांब रोडवरील लादगा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि.२२ सप्टेंबर) रात्री घडली आहे. शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड) अशी मृतांची नावे आहेत.
नांदेडमध्ये दोन दुचाकींची समारोसमोर धडक; दोन जण जागीच ठार - shivanand kamole
दोन दुचाकींची ससमारोसमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार (दि.२२ सप्टेंबर) रात्री मुखेड तालुक्यातील जांब रोडवरील लादगा येथे घडली आहे. शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड) अशी मृतांची नावे आहेत.
शिवानंद कामोले (वय २८ रा. कौठा ता. कंधार) आणि लक्ष्मण आचमारे (वय २४ रा. सावरगांव ता.मुखेड)
हेही वाचा -डोक्यात संशयाचे भूत, जन्मदात्या मातेकडूनच १६ महिन्याच्या चिमुकल्याचा घात
शिवानंद हे जांबहून हिप्परगा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्ष्मण यांच्या दुचाकीबरोबर लादगा गावाजवळ त्यांची जबर धडक झाली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने सावरगांव आणि कौठा गावावर शोककळा पसरली आहे. सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एस. मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव पोले, आत्माराम कामजळगे, शिवाजी आडबे हे करत आहेत.