नांदेड- अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गुणाजी कोकाटे (वय -40), पुंडलिक दामाजी शिंदे (वय 52, दोघेही रा. तिरकसवाडी, तालुका मुदखेड) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - माहूर शहरात अस्वलाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
याबाबत अधिक माहिती अशी, की बालाजी आणि पुंडलिक हे त्यांच्या (एमएच-26- यूए- 5444) दुचाकीने अर्धापूरकडून तिरकसवाडीला जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यातीवर तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-35-के-3690) धडक दिली. त्यावेळी बालाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलिक शिंदे यांना उपचारासाठी नेत आसताना त्यांचा मृत्यू झाला.