नांदेड- दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. नरसी ते बिलोली रोडवरील कासराळीलगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.
दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा मृत्यू, नरसी-बिलोली मार्गावरील घटना - नांदेडमध्ये दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी झाला आहे. सिद्धेश्वर विश्वनाथ स्वामी (वय ५०) आणि पठाण गौस अब्दुलसाब (वय २४) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
सिद्धेश्वर विश्वनाथ स्वामी (वय ५०) आणि पठाण गौस अब्दुलसाब (वय २४) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर, सय्यद फय्याज सय्यद हमरोहीन (वय २४) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला डॉ.नागेश लखमावार यांनी प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलवले आहे.
सदरील अपघात इतका भयानक होता, की दोन्ही दुचाकींचे टायर फुटून मॅक व्हिलचे तुकडे झाले. अपघाताची माहिती मिळताच बिलोली ठाण्यातील जामदार शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. यानंतर जखमीला बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.