नांदेड - भोकर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण २९ एप्रिल ते ४ मे दरम्यान घेण्यात आले. नांदेड जिल्ह्यात प्रथमच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात मैदानी व सांख्यिकी अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
भोकरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर, अनेक मैदानी खेळांचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे - bhokar
क्रिकेट, खोखो, कबड्डी, योगा, कराटे, रग्बी, लाठी काठी, बेसबॉल, चेस, ज्यूदो, वुशु, बॅटमिंटन, ट्रेडिशनल रेस्लिग, हार्डल्स, धावणे व सेल्फ डिफेन्स अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
नांदेड जिल्हा हौशी अँटो संघटना, रग्बी फुटबॉल संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व क्रीडा भारती शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, खोखो, कबड्डी, योगा, कराटे, रग्बी, लाठी काठी, बेसबॉल, चेस, ज्यूदो, वुशु, बॅटमिंटन, ट्रेडिशनल रेस्लिग, हार्डल्स, धावणे व सेल्फ डिफेन्स अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
हे प्रशिक्षण बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी तहसीलदार भारत सुर्यवंशी, मुख्य आयोजक बालाजी गाडेकर, पिराजी गाडेकर, कोच प्रलोभ कुलकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, मुख्याध्यापीका एस.एन.पाटील, संदीप पाटील कोंडलवार, उत्तमजी बाबळे, एल.ए.हिरे, पिराजी गाडेकर आदींची उपस्थिती होती.