नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 320 अहवालांपैकी 816 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीत 629 तर अँटिजेन तपासणीत 187 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 79 हजार 517 एवढी झाली असून यातील 66 हजार 307 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 हजार 416 रुग्ण उपचार घेत असून 187 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
दि. 28 ते 29 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 531 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के आहे.
नांदेडमध्ये आज 816 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर - nanded corona cases today
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 320 अहवालांपैकी 816 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
नांदेडमध्ये आज 816 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
- एकूण घेतलेले स्वॅब - 4 लाख 57 हजार 890
- एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 69 हजार 121
- एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 79 हजार 517
- एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 66 हजार 307
- एकूण मृत्यू संख्या -1 हजार 531
- उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के
- आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 28
- आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 89
- आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 404
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 11 हजार 416
- आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 187