नांदेड- विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत ३ जणांचा मृत्यू झाला. ही घटना देगलूरच्या नांदेड-हैदराबाद महामार्गावरील शंकरपेठ येथे घडली. देगलूर शहरातील सरसंबे कुटुंबातील एकाचा विवाह उद्या रविवारी हैदराबाद येथे होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी सरसंबे कुटुंबीय क्रुझरने निघाले होते. जखमींवर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या क्रुझरला ट्रकची धडक; 3 ठार
विवाह सोहळ्यासाठी सरसंबे कुटुंबीय क्रुझरने निघाले होते. जखमींवर हैदराबादमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देगलूरच्या लाईन गल्लीतील सरसंबे कुटुंबातील मल्लप्पा सरसंबे यांच्या मुलांचा विवाह रविवार २८ एप्रिल रोजी हैदराबाद येथे होणार आहे. यासाठी सरसंबे कुटुंबातील काही मंडळी आज शनिवारी सकाळी क्रुझर (क्रमांक एम एच - २५ आर ८३६४) गाडीने हैदराबादला निघाले होते. दरम्यान, शंकरमपेठ जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने (एम.एच-३४ एम ३१२९) क्रुझरला समोरुन धडक दिली.
या अपघातात शिवानी बंडप्पा सरसंबे (वय-१८) व क्रुझर जीपचालक शेख मनान (वय-३२ रा. भायगाव रोड) हे दोघे जागीच ठार झाले. यातील जखमींना हैदराबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा उपचारादरम्यान रजनी गुंडपा सरसंबे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.