नांदेड -शहरात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तिघेही गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील असूनरुग्णांची संख्या 34 वर गेली आहे. तिघांचा मृत्यू झाला असून 31 जणांवर उपचार सुरू आहेत. या बाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ३४ वर - news about corona virus
नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 34 झाली आहे.
गुरुवारी सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी गुरुद्वारा परिसरातील आणखी 3 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांवर औषधोपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सद्यस्थितीला स्थिर आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 329 स्वॅब घेण्यात आले असून, त्यापैकी 1 हजार 208 निगेटिव्ह आले आहेत. 62 स्वॅबचा अहवाल अजून प्रलंबित आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ.भोसीकर यांनी केले आहे.