नांदेड - बहुचर्चीत कृष्णूर धान्य घोटाळ्यातील चार जणांना सीआयडीने ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नांदेड - धान्य घोटाळ्यातील आरोपी सीआयडीच्या ताब्यात - Sumedh Bansode
बहुचर्चीत कृष्णूर धान्य घोटाळ्यातील चार जणांना सीआयडीने ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या विशेष पथकाने कृष्णूर औद्योगिक वसाहतीत 18 जुलै 2018 रोजी इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीत छापा मारून जवळपास 2 कोटी रुपयांचे धान्य जप्त केले होते. या प्रकरणी कारखान्याचे मालक अजय बाहेती यांच्यासह व्यवस्थापक, पुरवठा ठेकेदार आणि ट्रान्सपोर्ट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी या प्रकरणाची जबाबदारी उपविभागीय पेालीस अधिकारी नुरूल हसन यांच्याकडे सोपविली होती. त्यांनी या प्रकरणात तपास करून अनेक बाबी उघड केल्या. परंतु, या घोटाळ्याची व्याप्ती पाहता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते. मागील जवळपास दोन ते तीन दिवसांपासून सीआयडी औरंगाबादचे पथक नांदेडात तळ ठोकून होते.
या पथकाने अखेर कृष्णूर धान्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अजय बाहेती, प्रकाश ताबडीया, राम पारसेवार यांच्यासह अन्य एकास ताब्यात घेतले असून त्यांना काल वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते. आज या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.