नांदेड - मृत्यूनंतर तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगळी स्मशानभूमी द्यावी यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथीयांनी पालिकेसमोर आंदोलन केले आहे. या आंदोलनात शहरातील शेकडो तृतीयपंथी सहभागी झाले होते.
नांदेड शहरात एकूण नऊशेपेक्षा जास्त तृतीयपंथी असून त्यांच्यासाठी वेगळी स्मशानभूमी सरकारने द्यावी, यासाठी शहरातील शेकडो तृतीयपंथी एकत्र येऊन नांदेड महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. आम्हाला आमच्या मृत्यूनंतर मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. लोक आम्हाला सर्वसामान्य म्हणून स्वीकारत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी देऊन आमची होणारी कुचंबना थांबवावी, अशी मागणी शहरातील तृतीयपंथीयांनी केली आहे.