महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांचे बारा लाख पळवले, धूम स्टाईल चोरटे सक्रिय

राजेंद्र गाडले हे व्यापारी बुधवारी सांयकाळी एचडीएफसी बँकेत आले. बँकेतून त्यांनी 19 लाख 46 हजाराची रोकड काढली. बँकेमधूनच त्यांनी एका सहकारी व्यापाऱ्याला बोलावून जवळच्या पैशातून सात लाख रुपये काढून दिले. त्यानंतर त्यांनी उरलेले बारा लाख रुपये आपल्या स्कुटीच्या समोरच्या मोकळ्या जागेत ठेऊन ते बँकेबाहेर पडले होते. त्यानंतर हा प्रकार घडला.

नांदेडमध्ये धूम स्टाईल चोरटे सक्रिय

By

Published : Nov 7, 2019, 10:03 AM IST

नांदेड - शहरातील डॉक्टरलेन परिसरातून एका व्यापाऱ्याचे लक्ष विचलित करून बारा लाख रुपये रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी पळवली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. विशेष म्हणजे तातडीने यातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही.

नांदेडमध्ये धूम स्टाईल चोरटे सक्रिय

राजेंद्र गाडले हे व्यापारी बुधवारी सांयकाळी एचडीएफसी बँकेत आले. बँकेतून त्यांनी 19 लाख 46 हजाराची रोकड काढली. बँकेमधूनच त्यांनी एका सहकारी व्यापाऱ्याला बोलावून जवळच्या पैशातून सात लाख रुपये काढून दिले. त्यानंतर त्यांनी उरलेले बारा लाख रुपये आपल्या स्कुटीच्या समोरच्या मोकळ्या जागेत ठेऊन ते बँकेबाहेर पडले.

त्या नंतर ते कदम हॉस्पिटल जवळ आले असता, २ अज्ञात आरोपींनी गाडले यांना तुमची पैशांची बॅग पडल्याचे सांगितले. त्यामुळे गाडले यांनी गाडी थांबवत मागे वळून पाहिले, तोवर आरोपींनी गाडीवरची पैशाची बॅग घेऊन पळ काढला. धूम चित्रपटातील दृश्या समान काही सेकंदात ही घटना घडली. गाडले यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोवर चोरटा पसार झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी विचारपूस केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली, मात्र पोलिसांच्या हाथाला काहीच लागले नाही. या प्रकरणी राजेंद्र गाडले यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळकर हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details