नांदेड -हळद पावडरची विक्री करुन परत जाणार्या तिरुमला फुड कंपनीची चार लाखांची रोकड ( Tirumala Food Company ) चोरट्यांनी लुटली आहे. गुरुवारी सायंकाळी मालेगाव शिवारात ही घटना घडली. या घटनेप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा ( case registered ) दाखल करण्यात आला आहे. परभणी तालुक्यातील वालूर येथील तिरुमला फुड कंपनीचे वाहनचालक गौतम वाठोरे धर्माबाद येथे हळद विक्री ( Turmeric sale ) केल्यानंतर परत परभणीकडे जात होते. गुरूवारी सायंकाळी सहा वाजता नांदेड-वसमत महामार्गावरील ( Nanded-Wasmat Highway ) मालेगाव शिवारात चोरट्यांनी त्यांची गाडी अडवून चार लाख रुपये लंपास केले.
Theft of four lakhs : तिरुमला फुड कंपनीची चार लाखांची रोकड लुटली - vasamat crime news
हळद पावडरची विक्री करुन परत जाणार्या तिरुमला फुड कंपनीची ( Tirumala Food Company ) चार लाखांची रोकड चोरट्यांनी लुटली आहे. गुरुवारी सायंकाळी मालेगाव शिवारात ही घटना घडली. या घटनेप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा ( case registered ) दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर पोलीस ठाणे
धामदरी पाटीजवळ वाठोरे यांच्या वोलेरो क्रमांक (एम.एच.22एन.0739) पिकअप वाहनाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. काही संभाषण होण्यापूर्वीच त्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारुन वाठोरे यांना बेशुद्ध केले. घटना घडल्याच्या दोन तासाने चालक शुद्धीवर आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. वाठोरे यांनी झालेली घटना कंपनीच्या संचालकांना कळविल्यानंतर चालकाच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलीस ( case registered ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.