नांदेड- जिल्ह्यातील अर्धापूर येथील एका शेतकऱ्याने मुलांच्या लग्नासाठी जमा केलेल्या 5 लाखांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून पैशावर डल्ला मारला. भगवान हिंगमिरे असे शेतकऱ्याचे नाव असून ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
शेतकऱ्याच्या घरात पाच लाखांची चोरी.. मुलांच्या लग्नासाठी जमवली होती रक्कम - चोरी बातमी नांदेड
भगवान यांच्या दोन्ही मुलांचे लग्न पुढील महिन्यात होते. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी सोयाबीन, केळी, उसाचे पैसे घरात आणून एका डब्ब्यात ठेवले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री घरातील सगळे झोपेत असताना चोरट्यांनी हात साफ केला.
हेही वाचा-व्हायरल व्हिडिओ प्रकरण; अपायकारक भाज्या विकणाऱ्या 'त्या' विक्रेत्यावर गुन्हा दाखल
भगवान यांच्या दोन्ही मुलांचे लग्न पुढील महिन्यात होते. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी सोयाबीन, केळी, उसाचे पैसे घरात आणून एका डब्ब्यात ठेवले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री घरातील सगळे झोपेत असताना चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंद पानपट्टे, जमादार परमेश्वर कदम, किशोर हुंडे, संजय कळके, यांनी भेट देऊन माहिती घेतली. अर्धापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.