महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एप्रिलमध्ये वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण, पशुपालकांपुढे चाऱ्याची समस्या - एप्रिल

वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या, गायी आणि म्हशी यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

नांदेड तापमान १

By

Published : Apr 22, 2019, 3:11 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर गेला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या तापमानाबरोबरच उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत.

नांदेड तापमान

वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या, गायी आणि म्हशी यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. गुरांसह, बकऱयांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

तापमानातील वाढ आणि उजाड माळरानांमुळे मेंढपाळांना सर्वाधिक त्रास होत आहे. मेंढ्यांसह बकऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेळीपालन, पशुपालनावर चालतात. शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडत आहेत. यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details