महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड रेल्वे विभागातील तीन स्थानकावरील तात्पुरत्या थांब्याला तीन महिन्यांसाठी वाढ - nanded train news

रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणीवरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्यांसाठी वाढ देण्यात आली आहे.

train
रेल्वे

By

Published : Dec 6, 2019, 11:11 PM IST

नांदेड- रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणीवरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्यांसाठी वाढ देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

ती पुढील प्रमाणे –

1. गाडी नंबर 12715/12716 नांदेड -अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसला सेलू रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 7 डिसेंबरपासून तीन महिन्यांकरिता वाढवण्यात आला आहे.

2. गाडी नंबर 17687/17688 धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेसला रांजणी रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 9 डिसेंबरपासून तीन महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे.

3. गाडी नंबर 11403/11404 नागपूर-कोल्हापूर-नागपूर द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसला बसमत रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 9 डिसेंबरपासून तीन महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे.

प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details