नांदेड :तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये ५ फेब्रुवारीला संवाद मेळावा घेतला होता. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केलेली आहे. भारत राष्ट्र समितीकडून सीमावर्ती भागातील गावांमध्ये भेटीगाठीचे सत्र अनेक महिन्यांपासून आपण पाहत आहोत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देशभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आज लोहा येथे भारत राष्ट्र समितीची दुसरी जाहीर सभा होणार आहे.
भव्य दिव्य असा टेन्ट : या सभेसाठी लोहा शहर पूर्णतः गुलाबी व झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात सर्वत्र बॅनर व पताके लावून होल्डिंग लावण्यात आले. त्यातच भव्य दिव्य असा टेन्ट व पार्किंगची व्यवस्था बैल बाजार येथे करण्यात आली. या सभेसाठी 1 लाख नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. हेलिपॅड शहरालगत बनवण्यात आले आहे. त्यात 24 तासापासून सुरक्षा पोलीस कर्मचारी तैनात आहेत. लोहा शहरात प्रचंड सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.
नागरिकांना जेवण व पाण्याची व्यवस्था :मागील दहा दिवसापासून बीआरएस पार्टीतर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात शंभरहून अधिक चित्ररथांचा उपयोग करून गावोगावी प्रचार प्रसार करण्यात येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आला. ऊन, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आला आहे. तसेच उष्णता वाढू नये, यासाठी शंभरहून अधिक एअर कुलर लावण्यात आले आहे. नागरिकांसाठी सभेचे थेट प्रदर्शन व्हावे, म्हणून मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.