महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात - maharastra assembly election 2019

भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नांदेडमध्ये शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात

By

Published : Oct 21, 2019, 9:45 AM IST

नांदेड - जिल्ह्यात सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज सर्व उमेदवाराचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. पावसाची रिमझीम सुरू आहे. तरीही शेतातील कामे थांबल्यामुळे मतदान कमी होण्यापेक्षा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. येथे भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नांदेडमध्ये शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात

हेही वाचा-अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details