नांदेड - माहेरी आलेल्या पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी विरोध करणाऱ्या सासूचे जावयाने डोके फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल अष्टुरकर, असे जावयाचे नाव आहे. शहरातील सोमेश कॉलनीत हा प्रकार घडला.
नांदेड : पत्नीला परत घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाने फोडले सासूचे डोके - राहुल आष्टुरकर
राहुलची पत्नी आपल्या मुलीसह माहेरी आली होती. राहुल मध्यरात्री सासरी गेला. रात्रीच पत्नी आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्याने सासूला सांगितले. यावर सासूने विरोध दर्शवला असता त्याने सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मारहाण करत काठीने सासूचे डोके फोडून त्यांना गंभीर जखमी केले.
हेही वाचा - वसईत अमेरिकेतून परतलेल्या सुनेची सासूकडून हत्या, डोक्यात घातला फ्लॉवरपॉट
राहुलची पत्नी आपल्या मुलीसह माहेरी आली होती. राहुल रविवारी मध्यरात्री सासरी गेला. रात्रीच पत्नी आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्याने सासूला सांगितले. यावर सासूने विरोध दर्शवला असता, त्याने सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मारहाण करत काठीने सासूचे डोके फोडून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी राहुल अष्टुरकरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल आडे पुढील तपास करत आहेत.