महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या गाडीपुरा, मुखेड, बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव; एकाच दिवशी आढळले ६ रुग्ण, एकाचा मृत्यू - nanded corona news

नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेडात गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात सहा रुग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नांदेड
नांदेड

By

Published : May 22, 2020, 10:46 AM IST

नांदेड - गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त नमुन्यांच्या अहवालांपैकी ६ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी २ रुग्ण गाडीपुरा या भागातील आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

नवीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे. एक जण रावण कुळा, तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत. तर एक जण केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बिलोली येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहे.

या नवीन रुग्णांसह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ११६ वर पोहचली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ जणांना घरी सोडण्यात आले असून इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details