महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तपासणीच्या नावाखाली मारहाण करत लूट; नांदेडमधील सहा महामार्ग पोलीस निलंबित - highway police news

नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलीस चौकीच्या सहा पोलिसांना तपासणीच्या नावाखाली लुटमार केल्याच्या तक्रारीवरुन रविवारी निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित

By

Published : Aug 12, 2019, 5:32 PM IST

Updated : Aug 12, 2019, 5:53 PM IST

नांदेड - येथील नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली लुटमार केल्याची दाखल झाली होती. या प्रकरणी चौकीच्या ६ पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले आहे.

नांदेडच्या ६ महामार्ग पोलिसांवर निलंबनाची गदा


नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीबाबत मागील अनेक दिवसांपासून वरिष्ठ कार्यालयात तक्रारी दाखल केल्या जात होत्या. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून तपासणीच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार घडत होते. या गंभीर प्रकाराकडे पोलीस वरिष्ठ कार्यालय दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे या भागातील सुभाशिष कामेवार यांनी येथील पोलिसांचे चुकीचे व लुटारु पद्धतीने केलेल्या कामाचे सर्व पुरावे महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात दाखल करत तक्रार केली होती. एवढेच नव्हे, तर हा प्रकार थांबला नाही तर स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता.


यावरून पोलीस अधीक्षक संजय शेत्रे यांनी विजय सुर्यवंशी, दिपक जाधव, आबाजी खोमणे, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे आणि ईश्वर राठोड यांना निलंबीत केले आहे. सध्या, या निलंबनाच्या कारवाईमुळे येथील अनेक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

Last Updated : Aug 12, 2019, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details