नांदेड- उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील पीडित बलिकेला त्वरित न्याय देण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरुवात आमदार डी.पी. सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सत्ताधारी भाजपच्या आमदार कुलदीप सेंगर याने अल्पवयीन बलिकेवर अत्याचार केला होता. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास पीडित मुलीस व तिच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, हा अत्याचार सहन न झालेल्या पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आ. कुलदीप सेंगर याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक झाली. परंतु आ. कुलदीप सेंगरच्या इशाऱ्यावरून पीडितेच्या नातेवकांवर दबाव आणला जात आहे. साक्षीदारांना जिवंत मारले जात आहे. याच प्रकारे पीडितेच्या वडीलाचा अपघात घडवून आणण्यात आला आहे. या अपघातात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.