महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना 'शिवऋण प्रतिष्ठान'ची मदत; 22 दिवसांपासून दिलं जातंय जेवण

कोरोना सारख्या महामारीत सर्व जनता घाबरलेली असतांना, सर्व पोलीस, आरोग्य व शासकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या पंधरा दिवसांपासून शिवऋण प्रतिष्ठानचे प्रमुख अ‌ॅड. सचिन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने दररोज 300 ते 400 जणांना जेवणाची व्यवस्था केली आहे.

shivarun-pratishthan-distributes-food-to-police-doctors-in-nanded
shivarun-pratishthan-distributes-food-to-police-doctors-in-nanded

By

Published : Apr 13, 2020, 11:47 AM IST

नांदेड- कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र झटणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, मजूर, कामगार यांना मदतीचा हात म्हणून जेवण देण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना जेवण दिले जात आहे. गेल्या 20 ते 22 दिवसांपासून दररोज ताजे जेवण पुरविण्याची अखंड सेवा हे तरुण करत आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना 'शिवऋण प्रतिष्ठान'ची मदत

हेही वाचा-''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"

कोरोना सारख्या महामारीत सर्व जनता घाबरलेली असतांना, सर्व पोलीस, आरोग्य व शासकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या पंधरा दिवसांपासून शिवऋण प्रतिष्ठानचे प्रमुख अ‌ॅड. सचिन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने दररोज 300 ते 400 जणांना जेवणाची व्यवस्था केली आहे. आपल्याला जमेल अशी सेवा द्यावी असा हेतू बाळगून शिवऋण प्रतिष्ठान काम करत आहे.

सर्व काळजी घेत, ताजे जेवण बनवून कर्मचारी जिथे कार्यरत आहेत त्या ठिकाणावर त्यांना जेवण दिले जात आहे. तसेच गरजू, शरहात अडकलेले लोकांनाही जेवण दिले जात आहे. मदतीचा हात म्हणून हा स्तुत्य उपक्रम गेल्या 20 ते 22 दिवसांपासून राबवल्या जात आहे. या उपक्रमात दोन ते तीन वाहनाद्वारे अन्न पुरवठा करण्याचे अविरत काम शिवऋण प्रतिष्ठान कडून करण्यात येत आहे. याकामी अ‌ॅड.सचिन देशमुख, अ‌ॅड. सचिन जाधव, अजिंक्य देशमुख, उद्धवराव राजेगोरे, चंद्रकांत पाटील टेकाळे, शिवानंद शिप्परकर, गोविंद टेकाळे, अमोल राजेगोरे, शहाजी पाटील, विनायक दवे, कानबा पवार यांच्यासह अनेक स्वयंसेवकानी पुढाकार घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details