महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : शरद पवार उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत - जयराम रमेश - जयराम रमेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) रुग्णालयात आहेत. राहुल गांधींचे आणि त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश (Jayaram Ramesh) यांनी दिली. डॉक्टरांनी पवारांना 3-4 आठवड्यांच्या विश्रांतीची शिफारस केली आहे. त्यामुळे शरद पवार उद्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार नाहीत, असे रमेश यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे मात्र उद्या भारत जोडो यात्रेत सामील होतील असे ते म्हणाले.

जयराम रमेश
जयराम रमेश

By

Published : Nov 10, 2022, 12:19 PM IST

नांदेड :कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) हे 'भारत जोडो' यात्रेच्या (Bharat jodo yatra) निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात आहेत. राहुल गांधींचे आणि त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.

डॉक्टरांनी पवारांना 3-4 आठवड्यांच्या विश्रांतीची शिफारस केली आहे. त्यामुळे शरद पवार उद्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार नाहीत, असे रमेश यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे मात्र उद्या भारत जोडो यात्रेत सामील होतील असे ते म्हणाले. भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत 10 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) हे सहभागी होणार असल्याची माहिती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. आज सायंकाळी 5 वाजता नांदेड येथे राहुल गांधी यांची सभा आहे. या सभेला देखील राष्ट्रवादीचे नेतेमंडळी उपस्थित राहतील.

शरद पवार याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहुल हे गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये सहभागी होणार नाहीत. शरद पवार हे देखील उपस्थित राहतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रकृती अत्यावस्थच्या कारणामुळे शरद पवार या यात्रेला उपस्थित राहणार नाहीत. 31 ऑक्टोबरला शरद पवार यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरालाही दुसऱ्या दिवशी काही वेळासाठीच शरद पवार यांना उपस्थित राहता आले. दोन दिवसांपूर्वी आठ दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला असला तरी, अद्याप त्यांना आरामाची असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या भारत शरद पवार राहणार नाही अशी माहिती अशी माहिती मिळत आहे.

देशमुख बंधुंनी यात्रेकडे पाठ फिरवली? - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बहुतांश नेते भारत जोडोत हिरारीने सहभागी झाले आहेत. देशमुख बंधुंनी मात्र फक्त सोशल मिडियाच्या माध्यमातूनच आतापर्यंत यात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. पक्षाचे सर्वोच्च नेते, नव्याने निवडलेले अध्यक्ष यांची उपस्थितीत असतांना देशमुख बंधुंनी यात्रेकडे पाठ कशी फिरवली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details