नांदेड- कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या जीवनबिंदू या सॅनिटायझर कक्षाचे आणि संजीवनीदूत या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग नांदेडमध्ये करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात येणारे कर्मचारी, तक्रारदार तसेच अतिथींसाठी या सॅनिटायझर कक्ष आणि मोबाईल व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे.
नांदेडात संजीवनी व्हॅन व जीवनबिंदू कक्षाला सुरुवात, पोलिसांचा पुढाकार - निर्जंतुकीकरण
बाहेरच्या कुठल्याही रोगाचा संसर्ग होऊ नये, प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी जीवनबिंदू उपयोगी पडेल. सॅनिटायझर कक्षात एकाचवेळी दोघांना प्रवेश देत सॅनिटायझरचा फवारा करुन निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. तर, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी संजीवनीदूत ही मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागात संजीवनीदूत व्हॅन फिरणार आहे. शहरातील नागरिकांनादेखील त्याचा हळूहळू वापर करता येईल, असे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते जीवनबिंदू व संजीवनीदूत या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.