नांदेड -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन विविध पद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. अशा परिस्थितीत त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नांदेड पोलीस दलात संजीवनी दूत सॅनिटायझर व्हॅन सुरू करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर व्हॅन - nanded police news
पोलीस कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी संजीवनी दूत दाखल झाली आहे. नांदेड पोलीस दलात संजीवनी दूत सॅनिटायझर व्हॅन सुरू केल्याने पोलीसांना सुरक्षेच्या दृष्टीने मोठी उपयोगी पडणार आहे.
नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर व्हॅन
या व्हॅनमध्ये व्यक्ती दाखल झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण शरीर सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात येते. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून या संजीवनी दूत व्हॅनची निर्मिती करण्यात येत आहे.
पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून सुरू केलेल्या या आरोग्य संजीवनी दूत व्हॅनचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.