नांदेड- नांदेड-यवतमाळ जिल्ह्यात रिमझिम पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपासून कोरडी पडलेली पैनगंगा नदी आता प्रवाहित झाली. तर एरव्ही जुनमध्येच धो-धो कोसळणारा सहस्रकुंडचा धबधबा आता प्रवाहित झाला आहे.
नांदेडमध्ये संततधार पाऊस; पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागला
नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने सहस्रकुंडचा धबधबा आता प्रवाहित झाला आहे. पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याला जोरदार पाणी आले. त्यामुळे पर्यटक सहस्रकुंडच्या दिशेने जात आहेत.
आज पहिल्यांदाच सहस्त्रकुंड धबधब्याला जोरदार पाणी आले. त्यामुळे पर्यटक सहस्रकुंडच्या दिशेने जात आहेत. थेट जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा धबधबा चांगलाच प्रवाहित झाला. दरम्यान, नांदेड, यवतमाळसह हिंगोली जिल्ह्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
परवापर्यंत मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडतो की काय ? अशी स्थिती होती. मात्र, आता रिमझिम पावसाने मराठवाड्याचा बहुतांश भाग सुखावला आहे. तसेच या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे. त्यातच सहस्रकुंडचा धबधबा प्रवाहित झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.